पालखी सोहळ्यात शासनाकडून महिलांसाठी 'महिला उन्नती वारी' उपक्रमाचे आयोजन
पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसेच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘महिला उन्नती वारी’उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा; महिला वारकऱ्यांनी आरोग्यतपासणी करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
महिला व बालविकास विभाग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित उरळी कांचन येथील ‘महिला उन्नती वारी २०२६’ विशेष उपक्रमाचा शुभारंभ तसेच दोन्ही पालखी मार्गावर जनजागृती करण्यासाठी असलेल्या डिजिटल चित्ररथाचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह संबंधित अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, अंगणवाडी सेविका, आरोग्यदूत आणि महिला उपस्थित होते.
- महिला सक्षमीकरण, Women Empowerment, महिला सुरक्षा, Women Safety, महिला हक्क, Women's Rights, महिला व बालविकास विभाग, Women and Child Development Department
- आषाढी वारी, Ashadhi Wari, पालखी सोहळा, Palkhi Procession, वारकरी, Warkari, महिला वारकरी, Women Warkari
- महिला उन्नती वारी, Mahila Unnati Wari, महिला उन्नती वारी 2026, Mahila Unnati Wari 2026