असंख्य शहरवासियांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शहरात उत्साहात स्वागत
Jul 08 2026
24
असंख्य शहरवासियांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शहरात उत्साहात स्वागत
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - असंख्य शहरवासियांनी आज, बुधवारी (ता. ८) निगडी भक्ती-भक्ती चौक परिसरात उपस्थित राहून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शहरात प्रचंड उत्साहात स्वागत केले. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पालखी सोहळ्याचे मनोभावे स्वागत केले. यावेळी वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महापौरांनी पालखीच्या रथाचे सारथ्य केले.
परंपरेनुसार, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अनुभवण्यासाठी आलेल्या हजारो शहरवासियांच्या उपस्थितीने निगडी-आकुर्डी परिसर फुलून गेला होता. पालखीच्या स्वागतासाठी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. अनेकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करुन, फुगड्या खेळून पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद घेतला. विठू माऊलीच्या भेटीची आस घेऊन निघालेल्या वारकऱ्यांना पाहून सर्वांमध्येच उर्जा निर्माण झाली होती.
पालखी मार्गस्थ होताना प्रचंड गर्दीतही प्रत्येकाला पालखीचे दर्शन होण्याची ओढ लागली होती. सर्वांनी मनोभावे पालखीचे दर्शन घेतले. पावसाबरोबरच सारे भाविक भक्तीरसात न्हाऊन निघाले. मोबाईलच्या कॅमेऱ्याबरोबरच मनातही हा सोहळा सर्वांनी साठवून घेतला. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा संस्मरणीय ठरला.

- वारकरी, Warkari, वारकरी संप्रदाय, Warkari Sampraday, विठ्ठल भक्ती, Vitthal Devotion, भक्तीमय वातावरण, Devotional Atmosphere, शहरवासीय, City Residents, भाविक
- आषाढी वारी, Ashadhi Wari, पालखी स्वागत, Palkhi Welcome, पालखी सोहळा 2026, Palkhi Sohala 2026, निगडी, Nigdi, भक्ती भक्ती चौक, Bhakti Chowk, आकुर्डी, Akurdi
- संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, Jagadguru Sant Tukaram Maharaj