पालखी सोहळ्यानिमित्त पुणे मेट्रोची विशेष सेवा
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - वारकऱ्यांचा आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित व आरामदायी व्हावा यासाठी गुरुवार, दिनांक ९ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत पुणे मेट्रोची सेवा प्रत्येक ६ मिनिटांच्या अंतराने उपलब्ध राहणार आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी लक्षात घेता, वेळेची बचत करणाऱ्या, विश्वासार्ह आणि पर्यावरणपूरक प्रवासासाठी पुणे मेट्रोची निवड करा. आपल्या सहप्रवाशांच्या सोयीचा विचार करा, स्थानकावरील सूचनांचे पालन करा आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या, असे आवाहन महामेट्रोने केले आहे.