चिखली परिसरात सापडलेल्या हरणटोळ सापाची सर्पमित्रांकडून निसर्गात मु्क्तता
Apr 08 2026
44
चिखली परिसरात सापडलेल्या हरणटोळ सापाची सर्पमित्रांकडून निसर्गात मु्क्तता
पिंपरी, ता. ८ - चिखली परिसरात दुर्मीळ 'हरणटोळ' जातीचा साप सापडला. सर्पमित्र ओमकार देशमाने आणि शंभू लोंढे यांच्या तत्परतेमुळे या सापाला सुरक्षितपणे पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले.
सर्पमित्र शंभू लोंढे यांना रविवारी (ता. ५) दुपारी तीनच्या सुमारास मिळाली. काळूबाई माता मंदिराजवळ पिनू मोरे यांच्या घराच्या परिसरात साप असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्पमित्र ओमकार व शंभू तिथे पोचले.
सापडलेला साप हरणटोळ जातीचा होता. त्यांनी त्या सापाला पकडून सुरक्षितपणे निसर्गाच्या सान्निध्यात सोडले. ओंकार यांनी सांगितले की, ''हरणटोळ हा प्रामुख्याने झाडांवर राहणारा साप असून तो वेली, फांद्यावर आढळतो. पक्षी, त्यांची अंडी, तसेच लहान सरडे हे त्याचे मुख्य खाद्य आहे. घनदाट आणि उष्ण जंगलांमध्ये त्याचे वास्तव्य असते. शहर भागात तो क्वचितच दिसून येतो.''
साप आढळल्यास सर्पमित्रांना बोलवा...
''साप आढळल्यास घाबरुन त्याला मारु नका. सर्पमित्रांना संपर्क साधा. सर्पदंश झाल्यास रुग्णाला तत्काळ रुग्णालयात दाखल करा.'', असे शंभू लोंढे यांनी सांगितले.