'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम'येथील विद्यार्थी थेरगाव शिक्षण संकुलात स्थलांतरित
विद्यार्थ्यांना सर्व सुविधा तातडीने पुरवण्याचे आमदार शंकर जगताप यांचे निर्देश
पिंपरी, ता. ८ जुलै २०२६ - पावसामुळे ओढावलेल्या परिस्थितीमुळे चिंचवडगावातील 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम' येथील १८० मुले आणि १८० मुली अशा एकूण ३६० विद्यार्थ्यांना सध्या थेरगाव शिक्षण संकुल येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. बुधवारी (ता. ८) आमदार शंकर जगताप यांनी या विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या सुविधा व आरोग्याबाबत सविस्तर आढावा घेतला.
यावेळी महापालिका प्रशासन व आरोग्य विभागाला विद्यार्थ्यांच्या कोणत्याही गरजांकडे दुर्लक्ष होणार नाही, यासाठी आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था, शाळेतच प्राथमिक आरोग्य सेवा, २४ तास उपलब्ध असणाऱ्या आरोग्य सेवकांची नियुक्ती, पौष्टिक व दर्जेदार जेवणाची व्यवस्था तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी विशेष यंत्रणा कार्यरत ठेवण्याच्या स्पष्ट सूचना आमदार जगताप यांनी दिल्या.
या चिमुकल्यांची सुरक्षितता, आरोग्य आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
- थेरगाव शिक्षण संकुल, Thergaon Education Complex, थेरगाव, Thergaon, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, मुसळधार पाऊस, Heavy Rain, अतिवृष्टी, Heavy Rainfall, विद्यार्थ्यांचे स्थलांतर, Student Relocation, विद्यार्थी, Students,
- पुनरुत्थान समरसता गुरुकुलम, Punarutthan Samarasata Gurukulam, चिंचवडगाव, Chinchwadgaon