news
clock
'खबरदारी घ्या, उष्माघात टाळा....' महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या नागरीकांना सूचना

'खबरदारी घ्या, उष्माघात टाळा....' महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या नागरीकांना सूचना

 'खबरदारी घ्या, उष्माघात टाळा....' महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या नागरीकांना सूचना

 उष्माघाताच्या घटनांच्या शक्यतेमुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय यंत्रणा सज्ज, आयुक्तांची माहिती

पिंपरी, ता. १६ - राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढल्याने हवामान विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही नागरीकांना 'काळजी घ्यावी' असे सांगितले आहे. उन्हामुळे होणारे त्रास आणि उष्माघाताच्या घटनांच्या शक्यतेमुळे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.  कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले आहे की, उन्हाळ्यात योग्य काळजी घेतल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो. शरीराचे तापमान अत्यंत वाढल्यास चक्कर येणे, अशक्तपणा, उलट्या, डोकेदुखी, गोंधळ होणे किंवा बेशुद्धावस्था अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी विलंब न करता त्वरित सावलीत जाऊन प्राथमिक उपचार घ्यावेत व जवळच्या महापालिका रुग्णालयाशी संपर्क साधावा. महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर उपचार घेणे अत्यंत आवश्यक आहे.


ही आहेत उष्माघाताची लक्षणे.....

– अंगात प्रचंड उष्णता जाणवणे

– चक्कर येणे किंवा डोके हलके वाटणे

– मळमळ, उलट्या होणे

– तीव्र डोकेदुखी

– त्वचा कोरडी व गरम होणे

– गोंधळ, अस्वस्थता किंवा बेशुद्धावस्था


उष्माघात टाळण्यासाठी अशी घ्यावी काळजी.....

– दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हात जाणे टाळावे

– भरपूर पाणी आणि द्रवपदार्थ सेवन करावे

– डोक्यावर टोपी घावी, रुमाल बांधावा, छत्री वापरावी

– सैल व हलक्या रंगाचे सुती कपडे परिधान करावेत

– उपाशीपोटी बाहेर पडू नये

– थकवा जाणवल्यास त्वरित सावलीत विश्रांती घ्यावी

– लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी


वाढत्या उन्हामुळे वैद्यकीय यंत्रणा सज्ज.....

वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. संभाव्य उष्माघाताच्या घटनांचा विचार करुन महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा आणि वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी आणि कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित महापालिका रुग्णालयात उपचार घ्यावेत.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका


उष्माघात टाळण्यासाठी नागरीकांनी खबरदारी घ्यावी....

उष्माघात ही टाळता येण्याजोगी पण गंभीर समस्या आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याची कमतरता आणि अतिउष्णतेमुळे चक्कर येणे, मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात. अशी लक्षणे जाणवताच विलंब न करता सावलीत विश्रांती घ्यावी आणि त्वरित जवळच्या महापालिका रुग्णालयात उष्माघातावर प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत.

– डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories