पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक

पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक

पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत पार पडली महत्त्वपूर्ण बैठक 

पिंपरी, ता. ३ जुलै २०२६ - पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत आज, शुक्रवारी (ता. ३)  विधानभवनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.

या बैठकीत प्रकल्पातील प्रशासकीय, तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे,  बाधित शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या, पुनर्वसन, आंदोलनात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना नोकरी, विविध विभागांमधील समन्वय अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. 

याबाबत बोलताना, ''पिंपरी-चिंचवडच्या लाखो नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच राहील. मावळातील स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी आणि सर्व संबंधितांना विश्वासात घेऊन, कोणाचेही नुकसान न होऊ देता हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी आमची भूमिका आहे.'', असे आमदार लांडगे यांनी सांगितले. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories