हिंजवडी मेट्रो लाईन-३ मार्गिकेतील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, पीएमआरडीए मुख्यालयात बैठक

हिंजवडी मेट्रो लाईन-३ मार्गिकेतील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, पीएमआरडीए मुख्यालयात बैठक

हिंजवडी मेट्रो लाईन-३ मार्गिकेतील पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, पीएमआरडीए मुख्यालयात बैठक 

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालय, आकुर्डी येथे हिंजवडी परिसरातील मेट्रो लाईन-३ मार्गिकेच्या ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’आणि स्ट्रीट-लेव्हल डेव्हलपमेंट संदर्भात शुक्रवारी (ता. ३) एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, तसेच आवश्यक निर्देश देण्यात आले.

या बैठकीला महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्यासह अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य अभियंता रिनाज पठाण, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी आणि विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील उपस्थित होते. तसेच एमआयडीसी, महावितरण, महापारेषण आणि मेट्रो लाईन-३ च्या PCTRML कंपनीचे अधिकारी (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) या बैठकीत सहभागी झाले होते.

📌 बैठकीतील प्रमुख मुद्दे - 

🔸 वाहतूक कोंडीतून सुटका - हिंजवडी व परिसरात मेट्रोच्या कामांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी तत्काळ आणि ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश महानगर आयुक्तांनी दिले.

🔸 युटिलिटी शिफ्टिंगवर भर - मेट्रो प्रकल्पाच्या मार्गातील विविध सेवा वाहिन्या (Utilities) तातडीने आणि सुव्यवस्थितपणे स्थलांतरित करण्याबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले आणि त्यानुसार नियोजन निश्चित करण्यात आले.

🔸 पावसाळी पाण्याचे नियोजन - पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी स्टॉर्मवॉटर मॅनेजमेंट संदर्भात संबंधित विभागांना विशेष निर्देश देण्यात आले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories