अफूच्या बोंडांसह, मोबाईल, रोख रक्कम असा १ लाख ६० हजारांचा माल माणमध्ये जप्त

अफूच्या बोंडांसह, मोबाईल, रोख रक्कम असा १ लाख ६० हजारांचा माल माणमध्ये जप्त

अफूच्या बोंडांसह, मोबाईल, रोख रक्कम असा १ लाख ६० हजारांचा माल माणमध्ये जप्त 

पिंपरी, ता. ४ - माण (ता. मुळशी) परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाई करत हिंजवडी पोलिसांनी अफूच्या बोंडांचा चुरा, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई २ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता चांदेफाटा परिसरातील महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्रासमोरील भोईरवाडी ते माणकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला करण्यात आली.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क) आणि १५(अ) अन्वये गुन्हा क्रमांक ३७७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी पुष्पेंद्र सिंग किरपाराम (वय ३९, रा.  बाडमेर, राजस्थान) याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे १० किलो ३०० ग्रॅम सुकलेल्या अफूच्या बोंडांचा चुरा (डोंडा चुरा), एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

अंमली पदार्थांची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने हा माल बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास हिंजवडी पोलिस करत आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories