news
clock
माण रोड-हिंजवडी येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू,  टेम्पो चालक अटकेत

माण रोड-हिंजवडी येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू, टेम्पो चालक अटकेत

माण रोड-हिंजवडी येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू,  टेम्पो चालक अटकेत

पिंपरी, ता. १३ - भरधाव टेम्पोच्या धडकेत २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. ११) हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत माण रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ प्रभाकर पारखी फ्लोअर मिल समोर झाला आहे.  या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.  यश रविंद्र कुंभारे असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. 

मृत युवकाचे वडील रविन्द्र पांडुरंग कुंभारे (वय ५३ वर्षे, धंदा-नोकरी रा. नागपुर) यांनी तक्रार दिली आहे. कुंभार यांचा मुलगा हा होंडा अ‍ॅक्टिव्हावरुन जात असताना टाटा कंपनीच्या टेम्पोने त्याला माण रोडवर जोरदार धडक दिली. हा अपघात सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घडला. या धडकेत यश गंभीर जखमी झाला, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आरोपी टेम्पो चालक दिलीप मधुकर वाकचौरे (वय ४६, रा. घाटकोपर, मुंबई) याला पोलिसांनी अटक केली.  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील जड वाहनांच्या प्रवेशबंदीबाबतच्या अधिसूचनेचे आरोपीने उल्लंघन केले आणि निष्काळजी व बेदरकारपणे वाहन चालवून अपघात घडवला, अशी माहित पोलिसांनी दिली.  

या प्रकरणी आरोपीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात रविवारी (ता. १२) भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, १२५(अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ व ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories