बगाड यात्रेनिमित्त २ एप्रिलला हिंजवडी, वाकड व पिंपळे गुरव परिसरातील वाहतूकीत बदल
पुणे, ता. २८ - हिंजवडी येथे येत्या गुरुवारी (ता. २) ग्रामदैवत म्हातोबा देवाची यात्रा भरणार आहे. या यात्रेत दुपारी ३ वाजता पारंपारिक बगाड मिरवणूक आयोजित केली आहे. ही मिरवणूक हिंजवडी गावातून वाकड गावठाणाकडे येणार आहे. या मिरणुकीसाठी सुमारे ४० ते ५० हजार भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मिरवणूकीच्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. याशिवाय, सांगवी वाहतुक विभाग हद्दीत पिंपळे गुरव येथे गावयात्रेत बगाड मिरवणू निघाणार आहे. या मिरवणूकांना अडथळा होऊन नये व या दरम्यान वाहतूकही सुरळीत राहावी यासाठी हिंजवडी व सांगवी परिसरात वाहतूकीत बदल केला आहे. त्याबाबचे आदेश पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी जारी केले आहेत.
हिंजवडी, वाकड व पिंपळे गुरव परिसरात २ एप्रिलला दुपारी १२ ते रात्री १० यावेळेत नागरीकांनी पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करावा व वाहतूक शाखेला सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
वाहतूकीतील बदल पुढीलप्रमाणे -
हिंजवडी वाहतुक विभाग -
१. टाटा टी चौक ते वाकड नाका दरम्यान ये-जा करण्यास सर्व प्रकारचे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- विप्रो सर्कल फेज - २ चौकाकडून शिवाजी चौक मार्गे वाकडनाक्याकडे जाणारी वाहतूक टाटा टी जंक्शन चौक येथून लक्ष्मी चौक-भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२. जॉमेट्रीक सर्कल ते वाकडनाका दरम्यान ये-जा करण्यास सर्व प्रकारचे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- जॉमेट्रीक सर्कल चौकाकडुन शिवाजी चौक मार्गे वाकड नाक्याकडे जाणारी वाहतूक ही मेझा-९ चौकातुन डावीकडे वळून लक्ष्मी चौक- भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
३. शिवाजी चौक ते भुमकरचौक दरम्यान ये-जा करण्यास सर्व प्रकारचे वाहतूकीस मनाई करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग- इंडियन ऑईल चौक मार्गे वाकडगाव येथून इच्छित स्थळी जातील.
४. इंडियन ऑईल चौक ते विनोदे वस्तीचौक दरम्यान ये-जा करण्यास सर्व प्रकारचे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- इंडियन ऑईल चौकाकडून कस्तुरीचौक मार्गे विनोदे वस्ती व हिंजवडी गावठाणकडे जाणारी वाहतूक शिवाजी चौक व वाकडगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
५. इंडियन ऑईल चौक ते वाकडनाका, सयाजी अंडरपास दरम्यान ये जा करण्यास सर्व प्रकारचे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग इंडियन ऑईल चौक मार्गे वाकड नाका, सयाजी अंडरपासकडे जाणारी वाहतूक वाकड ओव्हर ब्रिजवरुन/वाकडगाव मार्गेइच्छित स्थळी जातील.
६. मुळा नदी ब्रिज पंक्चरते वाकडनाका (भुजबळ चौक) दरम्यान ये जा करण्यास सर्व प्रकारचे वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग- मुळा नदी ब्रिज पंक्चर येथून सर्व्हिस रोडने वाकड गाव व हिंजवडीकडे जाणारी वाहतूक हायवेने इच्छित स्थळी जातील.
वाकड वाहतूक विभाग -
१. कस्पटे चौक ते वाकडगांव चौक जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः कस्पटे चौक ते वाकडगावचौक येणारी वाहतूक कस्पटे चौक येथून उजवीकडे वळून जगताप डेअरी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२. मानकर चौक ते वाकडगांव चौक जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- १
मानकर चौक येथून वाकडगांव चौकाकडे येणारी वाहतूक काळेवाडी फाट्याकडे जावून इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्गः- २) कस्पटे वस्ती येथून वाकडगांवकडे जाणारी वाहतूक मानकर चौकातून डावीकडे वळुन कस्पटे चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
३. कस्पटे कॉर्नर ते वाकडगांव चौक जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :-१) कस्पटे कॉर्नर येथून वाकडगांव चौकाकडे जाणारी वाहतूक उजवीकडे वळुन म्हातोचा चौक मार्गे पिंकसिटी रोडने इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग :- २) म्हातोबा चौकाकडून कस्पटे कॉर्नरला येणारी वाहतूक मानकर कस्पटे चौकामार्गे इच्छित स्थळी जातील.
४. वाकडगांव चौककडून वाकडगांवठाण व वाकडनाक्या कडे जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- वाकडगांव चौकातून वाकडगावठाण कडे वाहतूक न जाता ती दत्तमंदिर रोडने इच्छित स्थळी जातील.
५. जंगवार शोरुम ते सयाजी अंडरपास कडे सर्व्हिस रोडने जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्गः जॅगवर शोरुम येथून सयाजी अंडरपासकडे सर्व्हिसरोडने न जाता हायवेरोडेने इच्छित स्थळी जातील.
६. दत्तमंदिर रोड उत्कर्ष चौकाकडून वाकडगांव चौक जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :-१) उत्कर्ष चौकाकडून डावीकडे वळून इच्छित स्थळी जातील.
पर्यायी मार्ग:-२) म्हातोबा चौकाकडून येणारी वाहतूक उत्कर्ष चौकातून उजवीकडे वळून दत्तमंदिर रोडने इच्छित स्थळी जातील.
७. वाकड वाय जंक्शन येथून कस्पटे चौक जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग:- वाकड वाय जंक्शन येथून सरळ पुढे काळेवाडी फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
सांगवी वाहतूक विभाग -
१. दत्त मंदिर चौक ते पिंपळे गुरव कमान या रस्त्यावर येण्या जाण्यास सर्व प्रकारचे वाहनांना मनाई करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने बँक ऑफ महाराष्ट्रकडून शिवगणेश चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.