औंध जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्णांमध्ये वाद, आयसीयु वॉर्डच्या दरवाजाची काच फोडली
Apr 14 2026
44
औंध जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्णांमध्ये वाद, आयसीयु वॉर्डच्या दरवाजाची काच फोडली
पिंपरी, ता. १४ - पुण्यातील औंध येथील शासकीय जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डमध्ये रुग्णांमध्ये झालेल्या वादातून एका ज्येष्ठ महिलेला जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. १३) घडली आहे. आरोपी विरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, कांता मारुती जाधव (वय ६९, रा. लक्ष्मीबाई कॉलनी, ताथवडे) तक्रार दिली आहे. बाबासाहेब शंकर डोंगरे (वय ४२ वर्षे, रा. औंधगाव) हा या घटनेतील आरोपी आहे. कांता जाधव या औंध जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होत्या. तसेच आरोपी डोंगरे हाही तिथेच उपचारांसाठी दाखल होता. कांता जाधव यांचा आरोपी पेशंटशी आयसीयु वॉर्डचा दरवाजा बंद केल्याच्या कारणावरुन वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने आयसीयु वॉर्डच्या दरवाजाची काच फोडली. या फुटलेल्या काचेचा तुकडा लागून फिर्यादी यांच्या उजव्या हाताच्या कोपराजवळ जखम झाली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.