दापोडी येथे १०० लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त

दापोडी येथे १०० लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त

 दापोडी येथे १०० लिटर गावठी हातभट्टीची दारु जप्त 

पिंपरी, ता. १४ - दापोडी परिसरात मोकळ्या जागेत सुरु असलेल्या गावठी हातभट्टी दारुच्या अवैध विक्रीअड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु जप्त केली. ही करवाई सोमवारी (ता. १३) करण्यात आली. 

शहर पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाचे पोलिस शिपाई संतोष विभीषण सपकळ यांनी फिर्याद नोंदवली. आरोपी नारायण दुर्गा साळवी (वय ४९, रा. माने फ्लोअर मिलजवळ, सिद्धार्थनगर, दापोडी) याच्याकडून सुमारे १०० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु जप्त केली. या दारुच किंमत अंदाजे १०,०० रुपये आहे.आरोपी हा कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररीत्या गावठी दारुची विक्री करत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

या प्रकरणी आरोपीविरोधात दापोडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला नोटिस बजावली आहे. 

--

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories