एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर  १ जुलैपासून कारवाई होणार, एचएसआरपी बसवण्यासाठी ३० जून अंतिम मुदत

एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर १ जुलैपासून कारवाई होणार, एचएसआरपी बसवण्यासाठी ३० जून अंतिम मुदत

 एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर  १ जुलैपासून कारवाई होणार, एचएसआरपी बसवण्यासाठी ३० जून अंतिम मुदत

पुणे, ता. १५  - अनेकदा मुदतवाढ देऊनही असंख्य वाहनधारकांनी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेतलेलीच नाही. त्यामुळे आता सरकाराने आता एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत दिली आहे. १ जुलै २०२६ पासून एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य आहे. त्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारक एचएसआरपी नंबर प्लेट बसवायचे राहिले आहेत.यापूर्वी गेल्या वर्षी, एचएसआरपी लावण्यासाठी ३० एप्रिल, ३० जून आणि १५ ऑगस्ट तसेच ३० नोव्हेंबर, ३१ डिसेंबर अशा पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.  वाहनधारकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने ही मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

मात्र, आता ही मुदतवाढ शेवटची असणार आहे. यानंतर, एचएसआरपी नसलेल्या वाहनधारकांकडून  एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने एचएसआरपी आरक्षित करता येते. त्यामुळे वाहनधारकांनी मुदतवाढीचा लाभ घेत तातडीने एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी, वाहनचोरी, बनावट नंबर प्लेट्सचा वापर आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी एचएसआरपी प्रणाली महत्त्वाची ठरणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories