महापालिकेतील ६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे

महापालिकेतील ६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे

महापालिकेतील ६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे

पिंपरी, ता. १५ - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. आता शासन यावर कारवाई करेल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली.

त्यामुळे या प्रकरणावर शासन कोणती कारवाई करणार ? याची तमाम शहरवासियांना उत्सुकता  लागली आहे आणि दुसरीकडे करदात्या नागरीकांच्या पैशांचा उधळपट्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लवकर कारवाई व्हावी ही तळमळही नागरीकांच्या मनात सुरु झाली आहे.   

महापालिकेतील हा भला मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शहरवासियांमध्ये संताप पसरला होता. विरोधकांनीही हा विषय लावून धरला. महापालिकेने त्यावर चौकशी समिती नेमली. समितीचा अहवाल आल्यानंतर आयुक्तांकडून दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाईची नागरीकांना अपेक्षा होती. मात्र, आता प्रशासनाने संबंधित कागदपत्रे आणि अहवाल राज्य शासनाकडे पाठवले आहेत. आता ६० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी प्रतिक्षाच नागरीकांच्या पदरात पडली आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories