डिजिटल अरेस्टची धमकी देऊन भोसरीमधील एका इसमाची ५५ लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ५ - डिजीटल अरेस्टची धमकी देऊन भोसरीमधील एका इसमाची ५५ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. याबाबत, पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी ४ आरोपींविरोधात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही फसवणूक १० मे ते ३ जून या कालवधीत घडली आहे.
फसवणूक झालेल्या इसमाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १) टेलिकॉम ऑफीसर दिल्ली २) धारक सी.बी. आय ऑफीसर बाराखंबा पोलीस ठाणे दिल्ली ३) आयसीआयसी बैंक, ४) सेन्ट्रल बैंक ऑफ इंडिया हे या घटनेतील आरोपी आहेत. आरोपींनी फिर्यादी इसमाची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यास व्हिडीओ कॉल केला व स्वतः पोलिस अधिकारी असल्याचे भासवले. फिर्यादी यांचा आधारकार्ड क्रमांक मनी लॉन्ड्रींग व ड्रग्सच्या गुन्हयात वापर करण्यात आलेला असून फिर्यादीस अटक होणार आहे असे सांगून त्यास अटकेची भिती घातली.
घराचे बाहेर जायचे नाही, कोणाला काही सांगायचे नाही असेही घाबरवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही फसवणुकीमध्ये सहभागी असल्याबाबत आर.बी.आय बँकेचे खोटे लेटर पी.डी. एफ स्वरुपात व्हॉट्सअपवर पाठवले, स्वतः पोलिस गणवेश परिधान करुन फिर्यादी इसमाला व्हिडीओ कॉल केला. त्याचा विश्वास संपादन केला.
जबरदस्तीने फिर्यादी इसमाला त्याच्या बॅंक खात्यावरुन ३९,००,०००/-रुपये, २) १६,००,०००/-रुपये असे एकूण ५५ लाख रुपये रक्कम भरण्यास भाग पाडले व फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींविरोधात सायबर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २०५,३०८ (२), ३१६ (२), ३१८ (४),३१९(२), ३३६(३),३३८,३४० ३(५) माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- , impersonation fraud, money laundering scam
- , Bhosari fraud case, Pimpri Chinchwad cyber police, online financial fraud
- digital arrest scam, digital arrest fraud, cyber fraud,
- सायबर क्राईम, व्हिडिओ कॉल फसवणूक, पोलिस अधिकारी बनून फसवणूक
- सायबर फसवणूक, भोसरी फसवणूक, ५५ लाखांची फसवणूक
- डिजीटल अरेस्ट, डिजिटल अरेस्ट फसवणूक,