जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ५० लाखांची आर्थिक फसवणूक, सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
जादा परताव्याचे आमिष दाखवून महिलेची ५० लाखांची आर्थिक फसवणूक, सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ५ - जादा परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार १० जून २०२३ ते जून २०२६ पर्यंत घडला आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. ४) सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिल्पा संदेश गोडसे (वय ४०, रा. अक्षयनगर, विशालनगर, पिंपळे निलख) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी स्मिता अंबरीश जोशी आणि अंबरीश जोशी (दोघेही रा. अक्षयनगर, विशालनगर, पिंपळे निलख) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिनांक १० जानेवारी २०२३ पासून ते जून २०२६ पर्यंत आरोपींनी फिर्यादीला जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी पैसे घेतले. यामध्ये, फिर्यादी महिलेची सुमारे ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) तसेच भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
- investment scam, high return scam, fraud complaint
- Sangvi Police Station, Pimpri Chinchwad crime, cheating case,
- investment fraud, financial fraud, woman cheated, Rs 50 lakh fraud
- सांगवी पोलिस ठाणे, पिंपरी चिंचवड गुन्हा, गुंतवणूक फसवणूक
- ५० लाखांची फसवणूक, महिला फसवणूक प्रकरण
- जादा परताव्याचे आमिष, आर्थिक फसवणूक