महापालिकेतर्फे उद्या सायकल रॅली, जागतिक पर्यावरणदिन व सायकल दिनानिमित्त आयोजन, नागरिकांना सहभागाचे आवाहन
महापालिकेतर्फे उद्या सायकल रॅली, जागतिक पर्यावरणदिन व सायकल दिनानिमित्त आयोजन, नागरीकांना सहभागाचे आवाहन
पिंपरी, ता. ४ - जागतिक पर्यावरण दिन व जागतिक सायकल दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 'सायक्लोथॉन - २०२६' या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आणि अंगीकारण्यासाठी नागरीकांनी या सायकल रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
ही सायकल रॅली ५ जूनला निगडी-प्राधिरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहापासून सकाळी ६ वाजता सुरु होणार आहे. नियोजित मार्गाने मार्गाक्रमण करुन दुर्गादेवी टेकडीवर या रॅलीचा समारोप होईल. त्यानंतर टेकडीवर वृक्षारोपण केले जाणार आहे. ही सायकल रॅली सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे. शहरातील नागरीकांनी विशेषतः तरुणाईने या फेरीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे महापालिकेने सांगितले आहे.
नोंदणीसाठी लिंक - Register now
https://forms.gle/FDrRphqjNo8YEnMG8