शहरातील अवैध दारु अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई
पिंपरी, ता. ३ - फुगेवाडी परिसरात हातभट्टीची विषारी दारु प्राशन केल्यामुळे २८ व २९ मे रोजी अनेक नागरीकांचे मृत्यू झाले. या घटनेनंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून शहरातील दारुचे अवैध अड्डे शोधून त्यावर कारवाई केली जात आहे. यातील काही कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे -
-पिंपळे सौदागरमध्ये “पॉवर लाईम पंच” दारुच्या १२ बाटल्या जप्त
- सांगवी पोलीस स्टेशनच्या पथकाने पिंपळे सौदागर, पुणे येथील सागर काटे चाळ परिसरात अवैध दारूविक्रीच्या प्रकरणी कारवाई केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पथकाने आरोपी सोमनाथ नागेशप्पा हनोरे (वय ४६, रा. काटे वस्ती, पेट्रोल पंपाजवळ, पिंपळे सौदागर, पुणे) याच्यावर छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून देशी दारु “पॉवर लाईम पंच” नावाच्या १२ प्लास्टिक बाटल्या (प्रत्येकी ९० मि.ली., किंमत ४०/- रु.), एकूण ४८०/- रुपयांची अवैध दारु जप्त करण्यात आली. आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना ही दारु पिशवीत ठेवून विक्री करत असल्याचे तपासात आढळून आले. या प्रकरणी शैलेश मधुकर काळभोर (पोलीस हवालदार ७८५, सांगवी पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक २३६/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. आरोपीस संबंधित नोटीस बजावण्यात आली असून, पुढील तपास सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
- येलवाडीतील हॉटेल दख्खन दरबारवर छापा
- दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी येलवाडी (ता. खेड, जि. पुणे) येथील हॉटेल दख्खन दरबारमध्ये सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीवर कारवाई करत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येलवाडी येथील हॉटेल दख्खन दरबारमध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी आरोपी कृष्णा नागनाथ डोमसे (वय २६, रा. वांजरखेडा हल्की, ता. शिरूर अनंतपाळ, जि. लातूर) हा हॉटेल मालकाच्या सांगण्यावरून देशी-विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान पोलिसांनी ३६० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कोणताही परवाना नसताना मद्यविक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महिला पोलीस शिपाई भाग्यश्री राजेंद्र गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७३/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात माऊली क्षिरसागर (रा. येलवाडी, ता. खेड) यांना पाहिजे आरोपी म्हणून नमूद करण्यात आले असून, आरोपी कृष्णा डोमसे यास भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
- देहूरोड परिसरात अवैध देशी दारू विक्री प्रकरणी महिला अटक; ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
- देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मामुर्डी परिसरातील स्वर्ग लॉजजवळ अवैध देशी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत एका ६५ वर्षीय महिलेला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एकूण ८४० रुपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०५ वाजता मामुर्डी येथील स्वर्ग लॉज परिसरात छापा टाकण्यात आला. या वेळी आरोपी महिला लता दशरथ मोहिते (वय ६५, रा. गोरक्ष तरस यांची रूम, स्वर्ग लॉजजवळ, मामुर्डी, पुणे) हिला विनापरवाना देशी दारूची विक्री करताना रंगेहाथ पकडण्यात आले. तिच्याकडून “पॉवर लाईम पंच” या ब्रँडच्या ९० मिलीच्या एकूण २१ बाटल्या देशी दारू जप्त करण्यात आल्या. ही दारू महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत विनापरवाना विक्रीसाठी ठेवण्यात आली होती, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.
- चिंचोली परिसरात अवैध गावठी दारू विक्रीवर छापा; १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, तरुणावर गुन्हा दाखल
- देहूरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने चिंचोली गावाच्या हद्दीत बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रीवर कारवाई करत एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत १,००० रुपये किंमतीची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता चिंचोली गावाच्या बाहेरील बाभळीच्या झाडाखाली छापा टाकण्यात आला. या वेळी आरोपी मकबुल अजगर अली (वय २२, रा. गायकवाडनगर, बुद्धविहार शेजारी, चिंचोली, ता. हवेली, जि. पुणे) हा विनापरवाना गावठी हातभट्टी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून सुमारे १० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, तिची किंमत अंदाजे १,००० रुपये (१०० रुपये प्रति लिटर) आहे. ही कारवाई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत करण्यात आली आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.
- रावेत परिसरात अवैध देशी दारू विक्रीचा प्रकार, १,०८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
- रावेत परिसरात अवैध देशी दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने कारवाई केली. या कारवाईत अमिन खाजाभाई शेख (वय ५०, रा. भोंडवेवस्ती, रावेत) याला ताब्यात घेण्यात आले आणि १,०८० रुपये किंमतीचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ०२ जून रोजी सायंकाळी सुमारे ७.१० वाजता शांताई कॉर्नर चौकाजवळ, राजेंद्र मुरकुटे यांच्या बांधकाम साईडजवळील पत्र्याच्या शेडखाली छापा टाकण्यात आला. आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी “पॉवर लाईन पंच” देशी दारू चोरी करून विक्री करत असल्याचे समोर आले. हा प्रकार महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत नोंदविण्यात आला असून, आरोपीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.
- चिखली परिसरात २० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त; २,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
- चिखली परिसरातील कुदळवाडी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री व साठवणुकीवर पोलिसांनी कारवाई करत एका तरुणीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत २० लिटर गावठी दारू (किंमत अंदाजे २,००० रुपये) जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ०२ जून २०२६ रोजी दुपारी १२.३५ वाजता बालघरे वजनकाट्याजवळ, पवारवस्ती, कुदळवाडी येथील पालामध्ये छापा टाकण्यात आला. या वेळी आरोपी दृष्टी अंशुमन बिरावत (वय २१, रा. बालघरे वजनकाट्यासमोर, कुदळवाडी, चिखली, पुणे) हिच्या ताब्यात विनापरवाना गावठी हातभट्टी दारू आढळून आली. तिच्याकडून एकूण २० लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, तिची किंमत अंदाजे २,००० रुपये आहे. ही कारवाई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत करण्यात आली असून, आरोपीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे.
- चिखली परिसरात १८ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त; महिला आरोपीवर कारवाई
- चिखली, कुदळवाडी परिसरातील पवारवस्ती येथे अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री व साठवणुकीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत द्रौपदी मनोज कुंभार (वय ४५, रा. श्री इंड्रस्टीयल सोल्युशनचे बाजुला, पवारवस्ती, चिखली, पुणे) हिच्या ताब्यात १८ लिटर गावठी दारू (किंमत अंदाजे १,८०० रुपये) जप्त करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, दि. ०२ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता श्री इंड्रस्टीयल सोल्युशनच्या बाजुला असलेल्या घरात छापा टाकला गेला. या वेळी आरोपीकडे विनापरवाना गावठी हातभट्टी दारू विक्रीसाठी जवळ बाळगलेली आढळून आली. ही कारवाई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत करण्यात आली असून, आरोपीस भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५ (३) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे.
- आळंदी परिसरात ३५ लिटर गावठी दारु जप्त
- आळंदी परिसरात पोलिसांनी बेकायदेशीर गावठी दारु जप्त केली. पोलीस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड अंतर्गत आळंदी पोलीस स्टेशनच्या पथकाने दि. २ जून रोजी सकाळी सुमारे ६:३५ वाजता मौजे चिंबळी, ता. खेड, जि. पुणे येथील बर्गेवस्तीपत्रा शेडच्या पाठीमागील भागात छापा टाकला.
पोलिसांनी तिथून ३५ लिटर तयार गावठी हातभट्टी दारू काळ्या रंगाच्या ३५ लिटर मापाच्या प्लॅस्टीक कॅनमध्ये साठवलेली असा सापडली. दारू आरोपी स्वतःच्या फायदेकरिता विक्रीसाठी बेकायदेशीरपणे ठेवत होता. या प्रकरणी गौरी रविंद्र राजपूत (वय ३८, रा. बर्गेवस्ती, चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
- च-होली येथे बेकायदेशीर विदेशी दारू विक्री
- च-होली परिसरात बेकायदेशीर विदेशी दारू विक्री करताना एका युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, दि. २ जून रोजी रात्री सुमारे ८:३० वाजता भोसले वस्ती, च-होली (ता. हवेली, जि. पुणे) येथील हॉटेल ‘लय भारी’च्या बाजूला ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रामेश्वर तुकडाजी पसरटे (वय २२, रा. फ्लॅट नं. ८०६, बिल्डिंग नं. ३, पंतप्रधान आवास योजना, माढा, च-होली, ता. हवेली, जि. पुणे; मूळ गाव चांभारवाडा, देऊळघाट, ता. जि. बुलढाणा) याच्याकडे सुमारे ₹2,510 किमतीची विदेशी दारू विनापरवाना बाळगलेली आढळली.
ही दारू तो ग्राहकांना बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यानुसार त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस शिपाई विशाल बाळासो बारवकर (पो.शि. ३४१४, नेमणूक: दिघी पोलीस स्टेशन) यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली. गुन्हा रात्री ११:०७ वाजता नोंदवण्यात आला असून पुढील तपास सपोनि भिसे (मो. ८६५२०९००७८) करीत आहेत.
- पिंपळे सौदागर येथे बेकायदेशीर विदेशी दारू विक्री; दोन आरोपींना अटक
- पिंपळे सौदागर परिसरात बेकायदेशीर विदेशी दारू विक्री करताना दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत, दि. २ जून रोजी सायंकाळी सुमारे ५:०० वाजता सागर काटे चाळ, पिंपळे सौदागर येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित माचरे आणि ममता माचरे (दोघेही रा. १० नंबर इमारत, भाटनगर, पिंपरी, पुणे) यांच्याकडे सुमारे ₹23,505 किमतीची विदेशी दारूची बाटलींचा साठा विनापरवाना आढळून आला. ही दारू ते अवैधरीत्या विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी फिर्यादी पोलीस शिपाई प्रदीप आप्पासाहेब चौगुले (पो.शि. ३३९२, पिंपरी पोलीस स्टेशन) यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.