कौटुंबिक कारणाने पत्नीला पतीने केली लाकडी दांडक्याने मारहाण 

पिंपरी, ता. २ - पत्नीची आई पत्नीला भेटायला आल्याचा राग धरुन पतीने पत्नीला लाकडी दांडक्याने मारहाण केली, पतीचे नातेवाईकही या मारहाणीच्या घटनेत सामील झाले. ही घटना श्रीमान पार्क वडगाव रोड आळंदी (खेड तालुका) येथे २५ फेब्रुवारीला घडली. आरोपींविरोधात रविवारी (ता. १) आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मारहाणीच्या घटनेत अभिषेक भिमराव भोरे (वय २३ वर्षे), भिमराव भोरे (वय ५० वर्षे) व एक महिला आरोपी आहे. फिर्यादी महिला राहते तिथे तिची आई तिला भेटण्यासाठी आल्याचा राग मनात धरुन फिर्यादी महिलेला तिचा पती अभिषेक भोरे  याने लाकडी दांडक्याने पाठीवर हातावर मारहाण केली. फिर्यादीच्या सासऱ्यांनी भिमराव भोरे व आणखी एका महिलेने तिला शिविगाळ दमदाटी केली व मारण्याची धमकी दिली आहे.

आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे व भारतीय दंड विधान कलम ३२६, ५०६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance