news
clock

 'दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस ऑफ इंडिया'चा उत्कृष्ट शाखा पुरस्काराने गौरव 

पिंपरी, ता. ९ - दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्टस ऑफ इंडिया (आयसीएआय) या सीए शाखेला 'वेस्टर्न रिजन'कडून  उत्कृष्ट शाखा पुरस्काराने गौरवण्यात आले.  पिंपरी-चिंचवड सीए विद्यार्थी संघटनेला 'सर्टिफिकेट ऑफ ऍप्रिसिएशन - २०२५' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

मुंबईमध्ये झालेला हा समारंभ पश्चिम विभागीय अध्यक्ष सीए केतन सैया, विभागीय उपाध्यक्ष सीए पियुष चांडक, सीए जीनल सावला, सीए फेनिल शाह यांच्या उपस्थितीत पार पडला. पिंपरी चिंचवड शाखेचे मावळते अध्यक्ष सीए वैभव मोदी, सीए सारिका चोरडिया, सीए मनोज मालपाणी, सीए महावीर कोठारी, विद्यार्थी संघटनेचे सीए धीरज बलदोटा यांनी हा पुरस्कार स्विकारला.

 यावेळी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष ओंकार टेंगले, उपाध्यक्ष रिंकू अग्रवाल, खजिनदार-सिद्धांत चोरडिया, सदस्य अनुवा बाबेल, इशिका मंडल, वर्षम बागली, सदस्य- प्राजक्ता जोशी उपस्थित होते.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories