शिवजयंतीनिमित्त नेहरुनगरमध्ये मिरवणूका, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
Mar 09 2026
31
शिवजयंतीनिमित्त नेहरुनगरमध्ये मिरवणूका, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
पिंपरी, ता. ९ - नेहरुनगरमधील 'एक गाव, एक शिवजयंती उत्सव समिती'च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवरायांची ३० फूट उंचीची मूर्ती फुलांनी सजवलेल्या चौथऱ्यावर विराजमान केलेल्या मूर्तीची ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले.
महापौर रवी लांडगे, कामगार नेते सचिन लांडगे, माजी महापौर संजोग वाघेरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, वर्षा जगताप, समीर मासुळकर, फजल शेख, युसूफ कुरेशी उपस्थित होते. उत्सव कमिटीचे तुषार वाघेरे, सुहास पालांडे, फारुक इनामदार, नितीन समगीर, दत्ता तळेकर, संजय चव्हाण, स्वप्नील वाघेरे, विक्की गुंजाळ यांनी संयोजन केले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले
नेहरूनगरमधीलच स्वराज्य प्रतिष्ठानतर्फेही शिवजयंती साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत रथातून शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, सारिका मासुळकर, ऋषिकेश भोसले, स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक महेश मांजळकर, साई पडवळ, अध्यक्ष आदित्य कट्टे, निहाल मुलानी, प्रतीक पडवळ, केशव विटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने मिरवणूकांमध्ये सहभागी होऊन शिवरायांना वंदन केले.