गावठी दारुची बेकायदेशीररित्या विक्री केल्याबद्दल नोटीस
पिंपरी, ता. ९ - गावठी दारुची बेकायदेशीररित्या विक्री केल्याबद्दल एका ४६ वर्षीय इसमाला नोटीस बजावली आहे. रविवारी (ता. ८) रात्री चिंचवड येथील बिजलीनगर झोपडपट्टीजवळ ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजु रामरतन शाहु (वय ४६ वर्ष, बिगारी, रा. नलावडे वस्ती, बिजलीनगर, चिंचवड) हा ५,०००/- किंमतीची गावठी हातभट्टीची दारु विनापरवाना बेकायदेशीरीत्या विक्री करत होता.
आरोपीला भारतीय न्याय संहिता ३५ (३) प्रमाणे नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई), प्रमाणे त्याच्याविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.