news
clock
दापोडीमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना बजावली नोटिस

दापोडीमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना बजावली नोटिस

दापोडीमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा, चौघांना बजावली नोटिस 

पिंपरी, ता. ११ - दापोडीमध्ये रविवारी (ता. १०) पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. जुगार खेळणाऱ्या ४ आरोपींना नोटिस बजावली आहे. 

दापोडी परिसरात रेल्वे स्टेशनच्या मागील बाजूस पत्रा शेडमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दापोडी पोलिस ठाण्यातील पोलिस पथकाने तेथे छापा टाकला असता तिथे ४ जण विनापरवाना, बेकायदेशिररित्या तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असताना सापडले. त्यांच्याकडे एकूण २४,०५०/- रुपयांचा माल सापडला. 

अशोक जग्गानाथ भालेसैन (वय ५२ वर्षे, मजुरी, रा. दापोडी), विशाल ज्ञानेश्वर सोनवणे (वय ४४ वर्षे, चालक, रा. दापोडी), चेतन किसन भाडाळे (वय-३६ वर्षे, नोकरी, रा. दापोडी) व मनोज दिलीप पवार (वय-४० वर्षे, चालक, दापोडी) हे चौघे जुगार खेळत होते. त्यांना पोलिसांनी बी.एन.एस.एस ३५ (३) प्रमाणे नोटिस दिली आहे. त्यांच्यावर 

दापोडी पोलिस ठाण्यात  महाराष्ट्र जुगार अँक्ट कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories