news
clock
मद्यधुंद पतीने पत्नीला पट्ट्याने मारले, पती अटक

मद्यधुंद पतीने पत्नीला पट्ट्याने मारले, पती अटक

मद्यधुंद पतीने पत्नीला पट्ट्याने मारले, पती अटक 

पिंपरी, ता. ११ -  मद्यपान करुन आलेल्या पतीने पत्नीला पट्याने व कोणत्यातरी हत्याराने मारहाण करुन गंभीर जखमी केले. यात मुलगाही ककिरकोळ जखमी झाला आहे. या मद्यपी पतीला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रुपीनगर-तळवडे येथे रविवारी (ता. १०) मध्यरात्री घडला आहे. 

याबाबत, मद्यपीच्या पत्नीने तक्रार दिली. रविवारी रात्री पती मद्यपान करुन घरी आला. पत्नीने घरातील लाईट बंद करुन पतीला झोपण्यास सांगीतले असता, मद्यधुंद पतीने पत्नीला  पटयाने मारहाण करुन शिवीगाळ केली. तिच्यावर कोणत्यातरी हत्याराने वार केले.  मुलालाही दुखापत केली. यात पत्नी जखमी झाली व मुलालाही दुखापत झाली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी, मद्यपी पती सुभाष उत्तेकर (वय ४५ वर्षे) यास अटक केली आहे. त्याच्याविरोधात चिखली पोलिस ठाण्यात बी. एन. एस कलम ११८ (२),११८ (१),११५ (२),३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories