दक्षिण म्हाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, ता. २३ - स्पायसर चौक-चाकण ते डोंगरवस्ती, निघोजे या परिसरातून ३८ वर्षीय तरुणाकडून ११९६ ग्रम वजनाचा गांजा अंमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केला आहे. गांजा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर दक्षिण म्हाळुंगे पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संभाजी विठ्ठल मात्रे (वय ३८ वर्षे, रा. ता. खेड) याने ११९६ ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगला होता. गांजासह एक मोबाईल हँडसेट असा एकुण ६९,८००/- किंमतीचा माल त्याच्याकडे सापडला आहे. नेमणूक अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस शिपाई रणधिर रमेश माने यांनी याबाबत तक्रार नोंदवली, अशी माहिती पोलिसांनी दिली.