नेहरुनगर येथील ज्वेलर्समधून ३३ लाख ९० हजार रुपयांच्या सोनसाखळ्यांची चोरी
पिंपरी, ता. २३ - नेहरुनगर येथील सराफी दुकानातून ३३ लाख ९० हजार रुपयांच्या ३९ सोन्याच्या साखळ्या चोरट्याने चोरुन नेल्या. ही घटना शुक्रवारी (ता. २२) नेहरुनगर-पिंपरी येथील संतोषीमाता चौकातील शिवम ज्वेलर्समध्ये घडली.
याबाबत, सराफ उमेश छगनलाल जैन (वय ५३ वर्षे, रा. नेहरुनगर) यांनी तक्रार दिली. आरोपी बच्चू आशिष गागुंली (वय ३६ वर्षे, रा. नेहरुनगर) याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, आरोपी अद्याप अटक नाही. आरोपीने २२ कॅरेट सोन्याच्या साखळीचे एकूण ३९ नग चोरुन नेले. चोरलेल्या मालाचे एकूण वजन २२५.८०० ग्रॅम आणि किंमत एकूण ३३ लाख ९० हजार रुपये आहे.
पोलिसांनी आरोपीविरोधात संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीयन्याय संहिता २०२३ च्या कलम-३०६ प्रमाणे दाखल केला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.