चाकण मार्केटयार्डजवळ अवैध गॅस रिफिलींगवर कारवाई, बालाजी गॅस एजन्सीवर पोलिसांचा छापा, ९ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
चाकण मार्केटयार्डजवळ अवैध गॅस रिफिलींगवर कारवाई, बालाजी गॅस एजन्सीवर पोलिसांचा छापा, ९ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, ता. ४ - पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने चाकण मार्केटयार्डजवळ बालाजी गॅस एजन्सीवर छापा टाकून अवैध गॅस रिफिलींग व्यवसायावर कारवाई केली. या कारवाईत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २५१ गॅस टाक्यांसह, गॅस रिफिलिंग साहित्य (वजन काटा, नोझल इ.) व एक महिंद्रा बोलेरो टॅम्पो असा एकूण ९ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी, दिनांक ३ जून २०२६ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला चाकण उत्तर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये बालाजी गॅस एजन्सी (चाकण मार्केटयार्डजवळ) येथे भरलेल्या गॅस सिलेंडरमधून मोकळया छोटया छोटया गॅस सिलेंडरच्या टाक्यांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलींगचा व्यवसाय सुरु आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला असता दोन आरोपींकडून २५१ गॅस टाक्यांसह, गॅस रिफिलिंग साहित्य (वजन काटा, नोझल इ.) व एक महिंद्रा बोलेरो टॅम्पो असा एकूण ९ लाख ७१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी १. प्रकाश सिद्धांना जवळागी (वय ३२ वर्षे, रा. चाकण) व २. तुषार प्रफुल्ल वारुळे (वय ३६ वर्षे, रा. एकतानगर, चाकण) यांना अटक केली आहे. दोन्ही आरोपी एजन्सीचा मालक शुभम प्रवीण परदेशी याच्या सांगण्यावरुन कोणतीही खबरदारी न घेता, अवैध गॅस रिफीलिंग करत होते.
आरोपीं विरुध्द चाकण उत्तर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम २८७, २८८ सह, जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह, स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ प्रमाणे गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करीत आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उप-आयुक्त, गुन्हे, रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त गुन्हे १ डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक रावसाहेब मोटे, गोरक्षनाथ बालवडकर, पांडुरंग देवकाते, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक महेश खांडे, पोलिस अंमलदार नितीन लोखंडे, गणेश हिंगे, गणेश कोकणे, विशाल गायकवाड, अमर कदम, विनोद वीर, समीर रासकर, मोहसीन अत्तार, अमोल गोरे, ज्ञानेश्वर कौलगे, चंद्रकांत गडदे व गणेश सावंत यांनी केली आहे.