आकुर्डी रेल्वे स्थानक परिसरात ६८ हजारांचा दारु व बिअर साठा जप्त; एकाला अटक
पिंपरी, ता. ८ - निगडी पोलिसांनी आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई करत सुमारे ६८ हजार ४४० रुपये किमतीचा बेकायदेशीर दारू व बिअरचा साठा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई रविवारी (ता. ७) सायंकाळी ६ वाजता केरला भवन समोर, आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात करण्यात आली. याप्रकरणी पोलिस हवालदार दत्तात्रय बबन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी संतोष कृष्णा जाधव (वय ५३, रा. इंदिरानगर, स्वामी विवेकानंद शाळेजवळ, ओटास्कीम, निगडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपीकडून बिअर, देशी-विदेशी दारु व मोटारसायकल असा एकूण ६८,४४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.