विशालनगर-सांगवी येथे  ५१ हजारांचा दारुचा अवैध साठा जप्त

विशालनगर-सांगवी येथे ५१ हजारांचा दारुचा अवैध साठा जप्त

 विशालनगर-सांगवी येथे  ५१ हजारांचा दारुचा अवैध साठा जप्त

पिंपरी, ता. ८ - सांगवी पोलिसांनी विशालनगर परिसरात कारवाई करत सुमारे ५१ हजार १८५ रुपये किमतीचा अवैध दारूचा साठा जप्त केला असून, दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई शनिवारी (ता. ७) दुपारी १२.३० वाजता गणपती चौकाजवळ, विशालनगर येथे करण्यात आली. याबाबत पोलिस शिपाई निलेश किसन शिंगोटे यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपी मनोज भरत ओझा (वय ४७, रा. अशोका सोसायटी, फ्लॅट नं. ३०६, काळेवाडी फाटा) आणि प्रविण नामदेव गायकवाड (वय ४०, रा. जगताप नगर, बेरगाव) यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींकडून अरविंद वाईन्स शॉप, विशालनगर येथून खरेदी केलेला दारूचा साठा बजाज अ‍ॅटो रिक्षा (एमएच-१४ एचएम ५५७२) मधून विक्रीसाठी वाहतूक करत असताना जप्त करण्यात आला.









Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories