बिजलीनगर, चिखली, काळेवाडी, हिंजवडी परिसरातून देशी दारुचा साठा जप्त

बिजलीनगर, चिखली, काळेवाडी, हिंजवडी परिसरातून देशी दारुचा साठा जप्त

बिजलीनगर, चिखली, काळेवाडी, हिंजवडी परिसरातून देशी दारुचा साठा जप्त 

पिंपरी, ता. ८ - फुगेवाडी येथे विषारी दारु प्राशन केल्यामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून घराच्या विविध भागातील दारुच्या अवैध अड्ड्यांवर कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसात केलेल्या कारवाईचा तपशील पुढील प्रमाणे -

१) बिजलीनगर परिसर -

चिंचवड पोलिसांनी बिजलीनगर परिसरात केलेल्या कारवाईत एका महिलेकडून गावठी हातभट्टीची दारु जप्त केली आहे. ६ जून २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता काबळे बिल्डिंगसमोरील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली. या महिलेकडे ५०० रुपयांची  सुमारे ५ लिटर, गावठी दारु आढळून आली. सदर दारु मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे माहीत असूनही तिचा बेकायदेशीर साठा व बाळगणूक केल्याप्रकरणी संबंधित महिलेवर चिंचवड पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

२) चिखली परिसर -

चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत तळवडे ते रुपीनगर मार्गावर देशी दारुचा बेकायदेशीर साठा पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी आरोपीला समजपत्र देण्यात आले आहे.

६ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता श्री कृपा फर्निचरसमोर पोलजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी सुरेश मंगल राय (वय ५२, मूळ बिहार) याच्याकडून अंदाजे रुपये २,४८० किंमतीची देशी दारु जप्त करण्यात आली. आरोपीवर चिखली पोलिस ठाण्यात  महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३) काळेवाडी परिसर -

काळेवाडी पोलिसांनी नढेनगर परिसरात एका महिला आरोपीकडून देशी दारूचा बेकायदेशीर साठा जप्त केला आहे. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता आयप्पा मंदिराशेजारी ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिलेकडून ६०० रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. सदर दारु बेकायदेशीररित्या लपूनछपून विक्री करताना ती आढळून आली. तिच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४) चिखली परिसर - 

जाधववाडी-चिखली परिसरात २६ वर्षीय युवकाकडून १८८० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. विकास राजाराम चौधरी (वय २६ वर्षे, रा. भारतमाता चौक, मोशी) असे आरोपी युवकाचे नाव आहे.  ही दारू आरोपी विकासने माऊली नावाच्या इसमाच्या सांगण्यावरुन विक्रीसाठी आणली होती.

आरोपीवर चिखली पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५ (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५) हिंजवडी परिसर -

हिंजवडी पोलिसांनी पायगुडेनगर, जांबे परिसरात देशी दारूचा बेकायदेशीर साठा जप्त करत एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ७ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता आर-७ लेबर कॉम्प्लेक्सजवळ, पायगुडे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मण बाबूराव अहिलवाड (वय ३५, रा. भूमकरवस्ती, वाकड) याच्याकडून  १,१२० रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. ही दारु आरोपीशे बेकायदेशीररित्या विक्रीसाठी साठवली होती.  आरोपीविरुद्ध हिंजवडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories