news
clock
अवैधरित्या दिड लाखांची देशी पिस्तूले बाळगणाऱ्या तिघांना तळेगावातून अटक

अवैधरित्या दिड लाखांची देशी पिस्तूले बाळगणाऱ्या तिघांना तळेगावातून अटक

 अवैधरित्या दिड लाखांची देशी पिस्तूले बाळगणाऱ्या तिघांना तळेगावातून अटक

पिंपरी, ता. ११ - मनाई आदेशाचा भंग करुन दिड लाख रुपये किंमतीची देशी बनावटीची तीन पिस्तूले ६ जिवंत काडतूसांसह बाळगणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी मंगळवारी (ता. १०) सोमाटणे फाटा-तळेगाव येथून ताब्यात घेतले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरदार अकबर सय्यद (वय २७ वर्षे, रा. यशवंत नगर, तळेगाव दाभाडे), विशाल नाना कुडेकर (वय ३५ वर्षे, रा. ता खेड) व प्रशांत बबुशा सोनवणे (वय २८ वर्षे, रा. ता खेड) हे आरोपी आहेत. हे आरोपी मंगळवारी (ता. १०) सोमाटणे फाटा, तळेगाव येथे पिस्तूलासह सापडले.

आरोपींनी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरात शस्त्र वापरण्याबाबत मनाई आदेश असताना, सदर आदेशाचा भंग केला व १ लाख ५० हजार रुपये किंमतीची ३ लोखंडी देशी पिस्तूल व ६०००/- किंमतीची ६ जिवंत काडतूसे (राऊंड) कोणताही कायदेशीर परवाना नसताना जवळ अवैधरित्या बाळगली होती. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.  

आरोपींविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ सह, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories