news
clock
निगडीमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराकडून जिवंत काडतूसांसह पिस्तूल जप्त

निगडीमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराकडून जिवंत काडतूसांसह पिस्तूल जप्त

निगडीमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराकडून जिवंत काडतूसांसह पिस्तूल जप्त 

पिंपरी, ता. १७ - अल्पवयीन गुन्हेगाराकडून दोन जिवंत काडतूसांसह देशी बनावटीचे पिस्तूल निगडी पोलिसांनी बुधवारी (ता. १५) जप्त केले. निगडी येथे भक्ती-शक्ती चौकाच्या भुयारी मार्गाजवळ हा मुलगा पोलिसांना सापडला. 

पोलिस शिपाई दिपक गुणवंत पिसे यांनी याबाबत फिर्याद नोंदवली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बालकाने हे पिस्तूल विक्रीसाठी आणले होते. त्याच्या या गैरकृत्यामुळे शस्त्रबंदी आदेशाचा भंग झाला. या अल्पवयीन गुन्हेगारावर गुरुवारी (ता. १६) निगडी पोलिस ठाण्यात  भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories