news
clock
पिंपळे सौदागरमध्ये शनिवारी व रविवारी होणार.... ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजांचा उत्सव

पिंपळे सौदागरमध्ये शनिवारी व रविवारी होणार.... ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजांचा उत्सव

पिंपळे सौदागरमध्ये शनिवारी व रविवारी होणार.... ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजांचा उत्सव

पिंपरी, ता. १७ - पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुंजोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त शनिवारी (ता. १८) व  रविवारी (ता. १८) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम व कुस्ती स्पर्धा होणार आहे. पिंपळे सौदागर पोलिस चौकीजवळील गावजत्रा मैदानावर हे कार्यक्रम होणार आहेत.  श्री मुंजोबा महाराज उत्सव समिती व पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

 शनिवारी (ता. १८) पहाटे सहा वाजता मुंजोबा महाराज यांना अभिषेक आणि महापूजेने उत्सवास प्रारंभ होईल. सकाळी ८ ते १० यावेळेत गावातील सर्व मंदिरांमध्ये पान-फुल अर्पण केले जाणार आहे. दुपारी ११ ते २ यावेळेत विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, सत्यभामा भजनी मंडळ, ज्ञानाई भजनी मंडळ आणि गुरुमाऊली भजनी मंडळाच्या वतीने भक्तीगीतांचा कार्यक्रम होईल. सायंकाळी पाच वाजता मुंजोबा महाराज पालखी सोहळा होईल. त्यानंतर सायंकाळी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम होईल.

उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. १९) सायंकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत कुस्त्यांच्या आखाडा होणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने होणारी ही कुस्ती स्पर्धा  मॅटवरील आहे. विजेत्या पैलवानास मानाचा श्री मुंजोबा महाराज केसरी किताब प्रदान केला जाईल. या आखाड्यात बाल गट (१४ वर्षाखालील), कुमार गट (१७ वर्ष खालील), व वरिष्ठ गटाची स्पर्धा होतील.

शहरातील नागरीकांनी श्री मुंजोबा महाराजांच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे आणि उत्सव कमिटीचे अध्यक्ष संतोष मल्हारी काटे यांनी केले आहे.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories