यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पावसाची शक्यता

यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पावसाची शक्यता

यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पावसाची शक्यता 

पुणे, ता. २९ - यंदा देशात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा सुधारीत अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. यापूर्वी हा अंदाज ९२ टक्के होता, मात्र आता त्यात घट करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच मान्सून कमी बरसणार आहे. 

हवामान विभागाने सांगितले आहे की, देशात मान्सून कालावधीत सरासरी ८७ सेंटीमीटर पाऊस पडतो. हा पाऊस ९६ ते १०४ टक्के दरम्यान असेल तर तो 'सामान्य' मानला जातो. मात्र यंदा तो सुमारे ९० टक्के राहण्याचा अंदाज असल्याने 'सामान्यपेक्षा कमी' श्रेणीत गणला जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते,  प्रशांत महासागरातील 'एल निनो' स्थिती पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम मान्सूनवर होऊ शकतो. त्यामुळे कमी पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने सांगितल्यानुसार कमी पाऊस पडला तर शेतीच्या कामांवर आणि पुढे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories