भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका सिंधुदुर्गमधील समुद्रतळावर स्थापित
पुणे, ता. २१ - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती रॉक परिसरात भारतीय नौदलाची सेवानिवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’समुद्रतळावर यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे.
या ठिकाणी देशातील अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि वैशिष्ट्यपूर्ण पाणबुडीपर्यटन प्रकल्प साकार होत आहे. मे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या समन्वयाने राबविण्यात येणारा हा प्रकल्प भारतीय पर्यटन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून हा प्रकल्प जागतिक स्तरावर सागरी पर्यटन आकर्षण म्हणून उदयास येणार आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.