आमदार प्रसाद लाड यांनी घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट

आमदार प्रसाद लाड यांनी घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट

आमदार प्रसाद लाड यांनी घेतली मनोज जरांगे-पाटील यांची भेट 

पुणे, ता. २२ - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ३० मे रोजी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे पुन्हा एकदा मोठे आंदोलन आणि बेमुदत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. मराठा समाजाची शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी आपल्या मागण्या त्यांनी मांडल्या व ''मराठा उपसमिती उपसमिती निष्क्रिय झाली असून ती बरखास्त करावी," अशी भूमिका मांडली. स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करावे व  शिंदे समितीला मुदतवाढ देऊन जुन्या नोंदी तपासण्याचे काम सुरु ठेवावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या -  

या मागण्या अशा - मराठवाड्यातील सर्व मराठा समाजाला २९ मेपूर्वी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे आणि मिरज संस्थानांबाबत १९९४ च्या धर्तीवर शासन निर्णय काढावा,  आंदोलनादरम्यान दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलनात जीव गमावलेल्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी द्यावी, तसेच सारथी संस्थेच्या योजना पुन्हा सुरु कराव्यात, कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्यांना तातडीने वैधता प्रमाणपत्र द्यावे.






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories