news
clock
इन्स्टिटयूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट संस्थेला  'सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था' पुरस्कार प्रदान

इन्स्टिटयूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट संस्थेला 'सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था' पुरस्कार प्रदान

इन्स्टिटयूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट संस्थेला  'सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था' पुरस्कार प्रदान

पिंपरी, ता. २४ - तळेगाव दाभाडे येथील इन्स्टिटयूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट संस्थेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 'सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था' पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही संस्था सीआरपीएफ तळेगाव दाभाडे ग्रुप सेंटर संचलित आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ८७ व्या स्थापना दिनानिमित्त गुवाहाटी येथे शनिवारी (ता. २१) आयोजित संचलन कार्यक्रमात हा सन्मान संस्थेचे प्राचार्य तथा उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांनी स्विकारला.

इन्स्टिटयूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट संस्थेने स्फोटक उपकरणे (आयईडी) निकामी करुन भारतीय सुरक्षा दलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष योगदान दिले आहे. या कार्याबद्दल संस्थेला 'सर्वोत्तम प्रशिक्षण संस्था' पुरस्काराने गौरवण्यात आले. 'सीआरपीएफ, पुणे'च्या तळेगाव दाभाडे येथील केंद्रामध्ये  इन्स्टिटयूट ऑफ आयईडी मॅनेजमेंट संस्थेची स्थापना झाली. गेल्या १३ वर्षांत संस्थेने १२ हजार ५५३ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय सुरक्षेकामी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रशिक्षणार्थींमध्ये राज्य पोलिस दल आणि सशस्त्र पोलीस दल, विशेष दल, मित्र परदेशी देश आणि इतर राष्ट्रीय सुरक्षा संस्थांच्या सैनिकांचा समावेश आहे. सन २०२३ मध्ये नवी दिल्लीतील उच्चस्तरीय जी-२० शिखर परिषद परिषदेमध्ये घातपातप्रतिबंधक निगराणीसाठी आयआयएम पुणे या संस्थेच्या कार्याची विशेष प्रशंसा करण्यात आली.  




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories