इस्कॉन मंदिराच्या वतीने रविवारी (ता. १९) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे पुण्यात आयोजन

इस्कॉन मंदिराच्या वतीने रविवारी (ता. १९) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे पुण्यात आयोजन

 इस्कॉन मंदिराच्या वतीने रविवारी (ता. १९) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे पुण्यात आयोजन

पिंपरी, ता. १८ जुलै २०२६ -  इस्कॉन मंदिराच्या वतीने रविवारी (ता. १९) भगवान जगन्नाथ रथयात्रेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. या रथयात्रेदरम्यान शहरातील मध्यभागात रविवारी दुपारी एक ते रात्री साडेसात वाजेपर्यंत वाहतूक मार्गावर बदल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.

असा असेल रथयात्रेचा मार्ग -

ही रथयात्रा स. प. महाविद्यालय येथून सुरू होईल. त्यानंतर ती लोकमान्य टिळक रस्त्याने पूरम चौक, डावीकडे वळून बाजीराव रस्त्याने शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, शगुन चौक, रमणबाग चौक, ओंकारेश्वर मंदिर, बालगंधर्व, जंगली महाराज रस्त्याने खंडोजी बाबा चौक, अलका टॉकीज चौक आणि पुन्हा टिळक रस्त्याने स. प. महाविद्यालय येथे समाप्त होईल.

वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग -

टिळक रस्ता - रथयात्रा सुरू झाल्यावर अलका चौकाकडून टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी अलका चौक- लालबहादूर शास्त्री रस्ता - सेनादत्त चौक - मांगीरबाबा चौक मार्गे जावे. पूरम चौकाकडून टिळक रस्त्याने डेक्कनकडे जाणाऱ्या चालकांनी बाजीराव रस्त्याने इच्छित स्थळी जावे.

बाजीराव रस्ता - रथयात्रा बाजीराव रस्त्यावर असताना पूरम चौकाकडून शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी पूरम चौक-टिळक रस्त्याने सरळ अलका चौक मार्गे पुढे जावे.

लक्ष्मी रस्ता - रथयात्रा लक्ष्मी रस्त्यावर असताना बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाणाऱ्या वाहनांनी सेवासदन चौक- अप्पा बळवंत चौक- शनिवारवाडा मार्गे प्रवास करावा.

शगुन चौक ते ओंकारेश्वर पूल - रथयात्रा या भागात असताना चालकांनी नदीपात्र रस्ता तसेच लक्ष्मी रस्त्याचा वापर करावा. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories