'जेईई अॅडव्हान्स्ड' परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे देशात मुलींमध्ये प्रथम
Jun 02 2026
19
'जेईई अॅडव्हान्स्ड' परीक्षेत पुण्याची आरोही देशपांडे देशात मुलींमध्ये प्रथम
पुणे, ता. २ - देशभरातील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या 'जेईई अॅडव्हान्स्ड' परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. आयआयटी दिल्ली झोनमधील शुभम कुमार हा ३६० पैकी ३३० गुण मिळवून देशात प्रथम आला, पुण्याची आरोही देशपांडे ३६० पैकी २८० गुण मिळवीत मुलींमध्ये देशात पहिली ठरली.
देशभरात पहिल्या पाच 'टॉपर्स' मध्ये शुभम कुमार : गुण ३३०, कबीर छिल्लर : गुण ३२९, जतिन चहार : गुण ३१९, मोहित शुक्ला : गुण ३१९, कुची संदीप : गुण ३१८ यांचा समावेश आहे. देशभरातील एकूण ५६,८८० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यात 10 हजार 107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. सन २०२६ मध्ये देशभरातून एकूण १ लाख ७९ हजार ६९४ विद्यार्थ्यांनी जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced) परीक्षा दिली होती.
यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना जेईई ॲडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहता येईल. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाइल नंबर आवश्यक आहे.
- मुलींमध्ये प्रथम, Girl Topper, All India Rank, AIR Topper, जेईई टॉपर, JEE Topper,
- IIT Delhi Zone, शुभम कुमार, Shubham Kumar, आरोही देशपांडे, Arohi Deshpande,
- जेईई निकाल, IIT प्रवेश परीक्षा, आयआयटी प्रवेश, IIT Admission Exam, आयआयटी दिल्ली झोन,
- जेईई अॅडव्हान्स्ड, JEE Advanced, JEE Advanced 2026 Result,