शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल संभाजी भेगडे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान

शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल संभाजी भेगडे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान

शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या शहर प्रमुखपदी नियुक्ती झाल्याबद्दल संभाजी भेगडे यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान 

पिंपरी, ता. २ - शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर प्रमुखपदी संभाजी भेगडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यात खासदार बारणे यांनी संभाजी भेगडे यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देत उद्योग क्षेत्रातील कार्यकर्ते आणि उद्योजकांना एकत्रित करुन संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले.

संभाजी भेगडे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे यांचे मार्गदर्शन नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार असून, पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक, व्यावसायिक आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटनेच्या बळकटीसाठी काम करणार आहे.” संभाजी भेगडे यांच्या नियुक्तीमुळे पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्रात शिवसेना उद्योग सहकारी सेनेच्या संघटनात्मक विस्ताराला नवी चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. उद्योग, सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी भेगडे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला. 

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भेगडे, पुणे शहराध्यक्षा सदानंद कडलक, राज्य समन्वयक विपुल चेपट, विष्णू पाटील, शुभम लोखंडे, ॲड. प्रवीण गायकवाड, सुदर्शन देसले, हरिनारायण डोबाळे, उद्योजक हेमंत नागपुरे, सौ. आरती भेगडे, दत्ताभाऊ कुचेकर, आशिष चव्हाण, धर्मेंद्र जयदे, चैतन्य होळकर, राहुल अडगळे, अश्विन खुडे, प्रताप देवडकर, महेश नेरे, तन्मय जाधव, सिद्धांत पाटील, साई पवार, संकेत शिंदे, सुदर्शन चिकणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories