पिंपरीगावातील जिजामाता रुग्णालयाच्या आवारातील खड्डेमय रस्ता तातडीने दुरुस्त करा, रुग्णांची मागणी
पिंपरीगावातील जिजामाता रुग्णालयाच्या आवारातील खड्डेमय रस्ता तातडीने दुरुस्त करा, रुग्णांची मागणी
पिंपरी, ता. २१ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीगावातील जिजामाता रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशीच रस्त्याची कमालीची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी रुग्णालयात आलेले लोक घसरुन व पाय अडकून पडल्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली केली आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने ताडडीने रुग्णालयाच्या आवारातील खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे.
पिंपरीगावातील महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयात उपचारासाठी येणाजाणाऱ्यांची दररोज मोठी गर्दी असते. येणाजाणारे नागरिक कामात असतात. रुग्णालयाच्या परिसरात रस्ता खड्डेमय आणि निसरडा झाल्याने तिथे अनेकजण पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला या ठिकाणी घसरुन पडल्यास दुखापत होऊन आणखी गंभीर धोका होऊ शकतो. याशिवाय, रुग्णालयाच्या आवारातील गटार तुंबून घाण पाणी परसरल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही.
रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने रस्ते व गटाराचा (ड्रेनेज) प्रश्न सोडवावा, अशी मागणी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
- रुग्ण सुरक्षा, Patient Safety, नागरिकांची मागणी, Citizens' Demand, रुग्णांची मागणी, Patients' Demand
- गटार तुंबले, Choked Drain, ड्रेनेज समस्या, Drainage Issue
- रुग्णालय परिसर, Hospital Premises, रुग्णालय प्रवेशद्वार, Hospital Entrance, खड्डेमय रस्ता, Pothole-Ridden Road
- जिजामाता रुग्णालय, Jijamata Hospital, पिंपरीगाव, Pimpri Gaon