न्यायव्यवस्था हा समाजातील दुर्बल घटकांना न्याय देणारा महत्त्वाचा आधारस्तंभ - अॅड. सतीश गोरडे
May 12 2026
37
न्यायव्यवस्था हा समाजातील दुर्बल घटकांना न्याय देणारा महत्त्वाचा आधारस्तंभ - अॅड. सतीश गोरडे
पिंपरी, ता. १२ - ''न्यायव्यवस्था ही कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. तसेच समाजातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय देणारा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.न्यायदान हीच समाजसेवा आहे. '', असे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालयातून बदली झालेल्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश दीपक डोंगरे, प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही. एन. गायकवाड आणि एम. ए. आवळे यांचा निरोप समारंभ झाला. अॅडव्होकेट्स बार असोसिएशनच्या सभागृहातील कार्यक्रमात दीपक डोंगरे, सुशील मंचरकर आणि अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश संध्या एस. नायर यांनी मनोगते व्यक्त केली.
अनिल शिंदे, अक्षय फुगे, सोहेल शेख, रवी मराठे, शंकर घगाळे, प्रशांत सस्ते, भूषण सुशांत पाटील आणि गोरडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. मंगेश खराबे यांनी सूत्रसंचालन केले, उपाध्यक्ष अनिल पवार यांनी आभार मानले.
कार्यक्रमाला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
- कार्यक्रम, event, मान्यवर, dignitaries, न्यायप्रणाली, legal system
- अॅड. सतीश गोरडे, Ad. Satish Gorde, ज्येष्ठ विधिज्ञ, senior lawyer, माजी अध्यक्ष, former president
- न्याय, justice, न्यायदान, legal service, समाजसेवा, social service,
- न्यायव्यवस्था, judiciary, समाजातील दुर्बल घटक, marginalized communities,