news
clock
चिंबळी फाटा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांना नोटिस

चिंबळी फाटा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांना नोटिस

चिंबळी फाटा परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांना नोटिस 

पिंपरी, ता. ७ - खेड तालुक्यातील मौजे कुरुळी येथील चिंबळी फाटा परिसरात सोमवारी (ता. ६) कल्याण मटका नावाचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. दक्षिण महाळुंगे पोलिसांनी दोघांना नोटिस बजावली आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ६) सायंकाळी ४:४५ वाजता या चिंबळी फाटा परिसरात  हॉटेल महाराजा जवळ आरोपी लोकांकडून पैसे घेऊन कल्याण मटका जुगार खेळत होते. तत्काळ चौकशीसाठी पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.

आरोपी १. प्रतीक उत्तरेश्वर दुनघव (वय ३०, रा. खंडोबा माळ, चाकण, ता. खेड) व २. आकाश शिवाजी जाधव, (वय ३०, रा. दशरथ पवार यांचे रूम, खंडोबा माळ, चाकण, ता. खेड) यांच्याविरोधात

 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १९८७ कलम १२ अ तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५ (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शिवाजी वसंत मरकड यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात तक्रार नोंदवली. पोलीसांनी आरोपींकडून संबंधित पैसे आणि खेळ साहित्य जप्त केले आहे. आरोपींना भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ कलम ३५ (३) अन्वये नोटिस बजावण्यात आली आहे. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories