आयएफएस परीक्षेत देशात १२५ वा क्रमांक पटकवणाऱ्या कबीर कांबळे यांचा पत्रकारांकडून विशेष सत्कार
May 16 2026
66
आयएफएस परीक्षेत देशात १२५ वा क्रमांक पटकवणाऱ्या कबीर कांबळे यांचा पत्रकारांकडून विशेष सत्कार
पिंपरी, ता. १६ - केवळ जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रिय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या आयएफएस (Indian Foreign Service) परीक्षेत दुसऱ्याच प्रयत्नात देशात १२५ वा क्रमांक पटकावणारे पिंपरी-चिंचवडचे सुपुत्र कबीर राहुल कांबळे यांचा पिंपरी-चिंचवडमधील पत्रकारांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कबीर कांबळे यांचे हे यश पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या यशाबद्दल कबीर यांचा भारतीय संविधान, महात्मा फुले लिखित ‘गुलामगिरी’ हे पुस्तक आणि शाल देऊन महानगरपालिकेतील पत्रकार कक्षात गौरव करण्यात आला. कबीर यांचे आई-वडील भारती व राहुल कांबळे यांचाही सन्मान करण्यात आला. कबीर कांबळे यांचे वडील राहुल हे एका कपंनीत कामगार आहेत. कामगाराच्या मुलाने घेतलेली ही भरारी तरुणाईला प्रेरणा देणारी आहे.
या प्रसंगी जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ, नाना कांबळे, दादा आढाव, सुनिल कांबळे, अविनाश कांबीकर, दिलीप देहाडे, युनुसजी, सुरज कसबे, संतोष जराड, युवराज दाखले, अनेक पत्रकार उपस्थित होते. महापालिकेच्या वतीनेही कबीर यांना गौरवण्यात आले आहे.