पथविक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पथविक्रेत्यांचे सोमवारपासून महापालिकेसमोर बेमुदत आंदोलन
May 16 2026
52
पथविक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पथविक्रेत्यांचे सोमवारपासून महापालिकेसमोर बेमुदत आंदोलन
पिंपरी, ता. १६ - फेरीवाला हॉकर्स महासंघाच्या वतीने पथविक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (ता. १८) पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता हे आंदोलनची सुरवात होईल.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत धडक कारवाई पथकाने पथविक्रेत्यांवरील अतिक्रमण कारवाई थांबवावी, पथविक्रेत्यांना अधिकृत ओळखपत्र आणि परवाने तत्काळ द्यावेत, पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात पथविक्रेत्यांना स्थिर व्यवसायासाठी पक्क्या स्वरुपाचे गाळे उपलब्ध करुन द्यावेत, देणे, तसेच 'पथविक्रेता
(उपजीविका संरक्षण व पथविक्रेता) महाराष्ट्र योजना २०१४' ची प्रभावी अंमलबजावणी करावी, स्मार्ट सिटीतील हॉकर्स झोनला प्राधान्य द्यावे, गटई कामगारांना अधिकृत स्टॉल उपलब्ध करून द्यावेत आणि उर्वरित पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण करावे.....या आमच्या प्रमुख मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत, असे फेरीवाला हॉकर्स महासंघ महाराष्ट्राचे नेते प्रल्हाद कांबळे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांच्या प्रश्नांबाबत महापालिका प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही महासंघाच्या सदस्यांनी दिला आहे.