news
clock
रहाटणीगावात श्री काळभैरवनाथांच्या उत्सवानिमित्त शुक्रवार व शनिवारी विविध कार्यक्रम

रहाटणीगावात श्री काळभैरवनाथांच्या उत्सवानिमित्त शुक्रवार व शनिवारी विविध कार्यक्रम

रहाटणीगावात श्री काळभैरवनाथांच्या उत्सवानिमित्त शुक्रवार व शनिवारी विविध कार्यक्रम

पिंपरी, ता. १० - रहाटणीगावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांच्या उत्सवानिमित्त शुक्रवार (ता.१०) व शनिवारी (ता. ११) विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष देवीदास नखाते यांनी दिली. 

शुक्रवारी सकाळी श्री काळभैरवनाथांची महापूजा होती.  सायंकाळी मिरवणूक निघणार आह. तसेच भव्य ढोल-लेझीम स्पर्धा आयोजित केली आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ११) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मैदानात पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने पुरुष व महिलांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या पुरुष पहिलवानांना काळभैरवनाथ किताबाने तर महिला पैलवानांना जोगेश्वरी किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे. पाच लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे.

 ग्रामदैवत श्री काळभैरवनाथांच्या या उत्सवासाठी प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही ग्रामस्थांनी उत्साहाने तयारी केली आहे. उत्सवामुळे रहाटणी परिसरात चैतन्याचे वातावरण आहे. शनिवारी होणाऱ्या कुस्ती स्पर्धेने उत्सवाची रंगत वाढणार आहे.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories