तळेगाव दाभाडे | ९ ऑक्टोबर २०२६ : तळेगाव दाभाडे येथील गोडांबे कडबाकुट्टी, बॅलाडोर टाऊन परिसरात एका ३९ वर्षीय शिक्षाचालकाला मारहाण करून हाताच्या बोटांवर दगड मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्तीच्या तीन बोटांना दुखापत झाली असून, वडील आणि त्यांच्या १९ वर्षीय मुलाविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी विनोद नवनाथ कांबळे (वय ३९, व्यवसाय रिक्षाचालक, रा. सॅमसम नगर, सेवाधाम हॉस्पिटलशेजारी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गोडांबे कडबाकुट्टी, बॅलाडोर टाऊन येथील शेजारी हा प्रकार घडला.
या प्रकरणात संदीप शेंद्रे आणि त्यांचा १९ वर्षीय मुलगा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, आरोपींनी विनोद कांबळे यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या उजव्या हाताच्या बोटांवर दगड मारून तीन बोटांना जखम केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीमागील नेमके कारण उपलब्ध माहितीत स्पष्ट करण्यात आलेले नाही.
या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(ब), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.