news
clock
काळेवाडीमध्ये प्लॉट खरेदीमध्ये ५२ लाखांची फसवणूक, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

काळेवाडीमध्ये प्लॉट खरेदीमध्ये ५२ लाखांची फसवणूक, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

काळेवाडीमध्ये प्लॉट खरेदीमध्ये ५२ लाखांची फसवणूक, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी, ता. २० -  रहाटणी येथील काळेवाडी फाटा परिसरात प्लॉट विक्री व्यवहारातून तब्बल ५२ लाख ४३ हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक २५ जानेवारी २०२५  ते दिनांक २३ मे २०२५ पर्यंत करण्यात आली आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. १९) दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फसवणूक झालेल्या इसमाने काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश संभाजी कर्णे (वय ३८, सध्या रा. सनशाईननगर, नखाते वस्ती, रहाटणी) व संतोष उर्फ संदीप बाबुराव पाटील (वय ४३, सध्या रा. वर्धमान हाइट्स, छत्रपती चौक, रहाटणी) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोघे पूर्वी रहाटणी येथील सत्यम डेव्हलपर्स या कार्यालयात काम करत होते. दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांची भागीदारी संपुष्टात आली होती. तरीदेखील, खरेदीदार हे आरोपींच्या ओळखीचे असल्याने फिर्यादीने विश्वासाने प्लॉट विक्रीची जबाबदारी त्यांच्याकडेच सोपवली होती.

दरम्यान, २५ जानेवारी २०२५ ते २३ मे २०२५ या कालावधीत आरोपींनी संगनमत करुन प्लॉट खरेदीदारांकडून ५२ लाख ४३ हजार ५००/- रुपये रक्कम घेतली. त्यांनी सत्यम डेव्हलपर्सच्या नावाने सहया करुन त्या पावत्या खरेदीदारास दिल्या. पैसे कंपनीच्या बँक खात्यात न जमा करता स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या खात्यांमध्ये जमा केले व रोख स्वरुपात घेतले. 

यामध्ये आरोपींनी पैशांची अफरातफर करुन फिर्यादी व संबंधित कंपनीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories