चऱ्होली परिसरात २ लाखांचा विदेशी दारुचा साठा जप्त, तिघांवर गुन्हा

चऱ्होली परिसरात २ लाखांचा विदेशी दारुचा साठा जप्त, तिघांवर गुन्हा

चऱ्होली परिसरात २ लाखांचा विदेशी दारुचा साठा जप्त, तिघांवर गुन्हा

पिंपरी, ता. २० - चऱ्होली परिसरात बेकायदेशीररित्या २ लाख रुपांयाची विदेशी दारु साठवून विक्री करणाऱ्या तिघांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (ता. १९) एका शेतातील पत्राशेडमध्ये करण्यात आली. दारुचा साठा पोलिसांनी जप्त केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाभाडे सरकार चौकाजवळील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी 

विदेशी दारू साठवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. आरोपी रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३ वर्षे, रा.चऱ्होली),  तिलक हेमंत पटेल (वय २१ वर्ष, रा. राज्य गुजरात) व अनिल रामसुरत यादव (वय २४ वर्ष, रा. राज्य गुजरात) यांनी २ लाख ४८०/- किंमतीच्या दारुचा साठा केल्याचे आढळले. या दारुची ते विक्री करत होते.  

या आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सध्या अटकेत नाहीत. पोलिस तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories